ज्येष्ठ नागरीक कायदा अंतर्गत आता मुला प्रमाणे विवाहीत मुली सुद्धा आई वडिलांची जबाबदारी स्वीकारणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. इतकेच नव्हे तर जावाई सुद्धा त्याच प्रमाणे जबाबदार आहे. त्यामुळे आता मुला-मुलींनी संयुक्तरित्या आपल्या आई-वडिलांचे सांभाळ करावे. मुलींनी व जावायांनी फक्त लहान भावावर आई-वडिलांची जबाबदारी न टाकता त्यांनी संयुक्तरित्या जबाबदारी स्वीकारली तर आई-वडिल स्वाभीमानाने जगु शकतील. मुलींनी व जावायांनी स्वार्थी होऊन मला माझ्या मुलांची फीस भरणे व इतर खर्च आहे असे सांगुन जबाबदारीपासून सुटका करु नये. त्यांनी असे विचार करावे की, ती जर एकटी मुलगी असती तर आई-वडिलांचा सांभाळ कुणी केला असता या विचारात त्याच्या पतीने सुद्धा त्याला तितक्याच रित्या सहकार्य करावे, जावायांनी त्यांना सुद्धा आपल्या आई-वडिलांप्रमाणे वागणुक दिली तर त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा त्याचप्रमाणे वागणुक मिळेल, कारण दोघांमध्ये ज्येष्ठांसाठी आदर निर्माण होईल, अशी अपेक्षा सुद्धा अॅड.. अश्विनी महेश धन्नावत यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी आयोजीत मागदर्शन शिबीरात करतांना केली. यावेळी अॅड.. बॉबी अग्रवाल, अॅड. अक्षय धोंगडे व इतर यंग जॉयन्सटस्चे सदस्य तथा ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978