‘सक्षम’ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मानस हॉस्पीटल, नाव्हा रोड, चौफुली शेजारी, जालना येथे दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी कायदेशीर शिबीर व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.
या शिबीरात विधीसेवा प्राधिकरण तर्फे न्यायाधिश श्रीमती पी.पी. भारसाकडे (वाघ) सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जालना तथा उच्च न्यायालयातील विधिज्ञ तथा राष्ट्रीय वक्ता अॅड. ओम माहेश्वरी जाधव यांनी विशेष मुलांसाठी असलेल्या नालसा स्किम / कायदा संदर्भात मार्गदर्शन करतांना न्यायाधीश श्रीमती पी.पी. भारसाकडे मॅडम यांनी सांगीतले की, जिल्हा विधीसेवा प्राधीकरण सदैव आपल्या पाठीशी आहे. आपण फक्त ‘सक्षम नव्हे सशक्त होऊन इतरांना सक्षम करण्याचे कार्य करावे’ कधीही विधी सहाय्याची गरज भासल्यास विधीसेवा प्राधीकरण कार्यालयात संपर्क साधावा.
यावेळी दिव्यांगासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सुद्धा करण्यात आला. तसेच दिव्यांग असून सुद्धा एम.पी.एस.सी. च्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक निकेश भोगीलाल मदारे, बँकेत 25 वर्षांपासून सेवा देणारी तथा आता सक्षमच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणारी मोहिनी धनकानी व बहुविकलांग असून देखील दहावीत 80% मार्क प्राप्त करणारा व बुद्धीबळ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश संपादित करणान्या आदित्य घुले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुरेशदादा पाटील सक्षम राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रकाशजी आंबेकर प्रसिध्द मनोउपचार तज्ञ मानस हॉस्पीटल, मा. प्राचार्य प्रितीताई पोहेकर, सावरकर कनिष्ठ महाविद्यालय, बीड, सक्षम प्रांत महिला प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अरविंद नाईक सक्षम जालना जिल्हा अध्यक्ष, श्रीमती मोहिनी धनकानी सक्षम जिल्हा प्रमुख जालना, डॉ. अशोक सिनगारे सक्षम जिल्हा सचिव जालना तथा अॅड. महेश धन्नावत पॅनल अॅडव्होकेट जिल्हा विधी प्राधिकरण यांनी विशेष प्रयत्न केले.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978