जालना । जालन्यात व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून अपहरण करणाऱ्या चौघांविरुद्ध चनदंझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत व्यापारी लतीफखान् समशेरखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत तरी दिनांक 17/02/2023 रोजी सायंकाळी 7 ते 7-30 वाजेचे दरम्यान मी माझे घरी असतांना मला किडनॅप करुन माझेकडून दोन लाख रुपये घेण्याचे उद्देशाने माझे ओळखीचे सुंदरनगर येथील शेख शेरीफ शेख शफी व सोरटीनगर महिंद्र शोरुमच्या मागे जालना येथील सय्यद हादी सय्यद हसन यांनी संगनमत करुन त्यांची आय20 ग्रे रंगाचे कार मध्ये बसवुन शेलगांव जवळील डोंगरभागात घेवुन जावुन तेथे माझे अपहरण करुन पैशासाठी मला शिविगाळ व मारहाण करुन तसेच माझे गळ्याला खंजीर लावुन मला जिवे मारण्याची धमकी देवुन माझ्याकडुन खंडणी म्हणुन दोन लाख रुपयाची मागणी करुन एक लाख रुपये खंडणीची रक्कम घेतली असल्याचे म्हटले आहे. त्यावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात अपहरण करणाऱ्या चौघांविरुद्ध भादवी कलम 364 (अ), 385, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चनदंझिरा पोलीस हे करीत आहे..
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978