जगात कुठेही जा परंतु मातृभाषेला विसरू नका. कारण इंग्रजी भाषेमुळे जगातील 2350 भाषा मरणपंथाला लागल्या आहेत.तर काही भाषांचे अस्तित्व पूर्णतः पुसले गेले आहे.यामध्ये उत्तर मध्य अमेरिका 222, दक्षिण अमेरिका 226,युरोप/रशिया 148, आशिया 693, आफ्रिका 428,ओशियाना 733 इत्यादी खंडामध्ये अशी मातृभाषेची गंभीर परिस्थिती असल्याचा उल्लेख जागतिक भाषा समितीच्या निष्कर्षात केला आहे. त्यामुळे प्रत्येक खंडाने व देशांनी आपली मातृभाषा वाचवीण्यासाठी कटीबद्ध असायला हवे.आज प्रत्येक देशात मातृभाषेला महत्व आहे.त्याचप्रमाणे भारतात सुध्दा प्रत्येक राज्यात मातृभाषेला तेवढेच महत्त्व आहे आणि असायलाच पाहिजे.मातृभाषा शिकविली जात नसून जन्मताच अवगत असते याला ईश्वरी देन सुध्दा म्हणता येईल.त्यामुळे जगातील कोणताही व्यक्ती असो त्याला आपल्या मातृभाषेचा गर्व आणि अभिमान असने सहाजीकच आहे.
जगामध्ये प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचे महत्व कळावे या उद्देशाने नोव्हेंबर 1999 मध्ये यूनेस्को येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.कारण 21 फेब्रुवारी 1952 मध्ये ढाका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या भाषा नितीचा विरोध केला होता.कारण त्यांना आपल्या मातृभाषेचे अस्तीत्व टीकवुन ठेवायचे होते.प्रदर्शनकारी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती की बांग्ला भाषेला अधिकारीक दर्जा मिळावा.परंतु अशा परीस्थितीत पाकिस्तान पुलिसने प्रदर्शनकारी विद्यार्थ्यांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला.परंतु विरोध थांबला नाही.अंतता पाकिस्तान सरकारला बांग्ला भाषेला अधिकारीक दर्जा द्यावा लागला. मातृभाषेच्या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांना श्रध्दांजली देण्यासाठी यूनेस्कोने नोव्हेंबर 1999 ला जनरल कांफ्रेंसमध्ये आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला व 21 फेब्रुवारी ही तारीख ठरवीण्यात आली.तेव्हापासुन संपूर्ण जगात 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केल्या जावु लागला.संयुक्त राष्ट्रानुसार जगात बोलल्या जानाऱ्या एकुण भाषा साधारनतः 6900 आहेत.यात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 10 भाषेमध्ये जापानी, इंग्रजी,रूसी,बांग्ला,पुर्तगाली, अरबी,पंजाबी,मंदारिन,हिंदी आणि स्पेनिश इत्यादी आहेत.भारताचा विचार केला तर मातृभाषेला आगळे वेगळे महत्व दीसुन येते.भारतात प्रत्येक 40 कीलोमिटर नंतर आपल्याला भाषा बदलतांना दीसते.
ज्या प्रमाणे म्हटल्या जाते, “कोस-कोस पर पाणी बदले,चार कोस पर वाणी” याप्रमाणे भारतात मातृभाषा बदलतांना दीसते.महाराष्ट्राची मातृभाषा मराठी जरी असली तरी प्रत्येक 40 कीलोमीटर नंतर लोकांच्या रहानीमानासह भाषांमध्ये संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा गोडवा पहायला मिळतो.भाषेचा विचार केला तर भारताची भाषा व संस्कृती ही जगावेगळी असल्याचे दिसून येते.भारतात अनेक जातींचे, पंथाचे,धर्माचे लोक राहतात.भारतात 28 राज्य व 8 केंद्र शासीत प्रदेश आहेत.त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्याची मातृभाषा वेगळी आहे.त्यातही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक 40 कीलोमिटरच्या अंतरावर भाषेचा वेगळा गोडवा दीसुन येतो.भारतात “हिंदी दिलं की धडकन तो मातृभाषा दिलं की आवाज” यापध्दतीने मातृभाषेचा व राष्ट्रीय भाषेचा सन्मान केल्या जातो.वल्ड लॅंग्वेज डेटाबेसनुसार 22 व्या संस्करण इथोनोलॉजच्या नुसार जगातील 20 सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा मानल्या जाते.ज्याप्रमाणे मातृत्व आणि पितृत्व महत्वाचे आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा महत्त्वाची असल्याचे मी समजतो.जगात अनेक भाषांचे भंडार आहेत यात दुमत नाही.त्या संपूर्ण भाषा अवगत केल्याही पाहिजे यामुळे ज्ञानाचा भंडार वाढतो.परंतु त्या भाषेच्या आड मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.आजही भारतात इंग्रजी भाषेला जास्त महत्व दील्या जाते.भारतातील नामांकित व्यक्ती किंवा हायप्रोफाइलमध्ये रहाणारे व्यक्तीसुध्दा इंग्रजी भाषेला महत्व देवून मातृभाषेचा व राष्ट्रीय भाषेला विसरतांना दिसतात.याला सरकारने कोठेतरी थांबवीले पाहिजे.यामुळे मातृभाषेचा व राष्ट्रीय भाषेचा अपमान होतो.जगातील कोणताही देश असो प्रत्येकाची मातृभाषा म्हणजे पुर्वजांचा एक ठेवाच आहे.त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतेही कार्य करतांना किंवा बोलतांना मातृभाषेला प्रथम स्थान द्यायला पाहिजे.प्रत्येकांची मातृभाषा ही त्या-त्या संस्कृती नुसार अवगत असते.त्यामुळे आपण जर बाहेर निघालो तर प्रत्येक 40 किलोमीटर नंतर आपल्याला प्रत्येक भाषेत थोडा-थोडा बदल झालेला दिसतो.
सांगायचे तात्पर्य की देशात किंवा जगात कुठेही जावे परंतु मातृभाषेचा विसर पडणार नाही याची काळजी सर्वांनीच जातीने घेतली पाहिजे. जगातील संपूर्ण भाषेचा व संस्कृतीचा अभ्यास करायलाच पाहिजे.परंतु आपल्या संस्कृतीला किंवा मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी सुध्दा घेतली पाहिजे.सध्याच्या परीस्थितीत आपण पहातो आई-बाब,काका-काकु,मामा-मामी, आजी-आजोबा इत्यादी अनेक जुन्या शब्दांना विसरून मम्मी,डॅडी,पप्पा,मॉम,अन्टी,ग्रॅनफादर इत्यादी अनेक इंग्रजी शब्दांचा वापर होतांना आपण पहातो. त्याचप्रमाणे मामी-मामा, काका -काकु,माऊशी-माऊसाजी या शब्दाला आगळे वेगळे महत्त्व आहे.कारण यातुनच नात्याची वेगवेगळ्या पध्दतीने ओळख दिसून येते.परंतु आता या नावाचे महत्व विसरून या सर्वांना अन्टी व अंकल मध्ये परीवर्तीत केल्याचे दिसून येते यामुळे खरे नाते कोणते हे कळतच नाही.याचा परीणाम मातृभाषेवर होवु शकतो याला नाकारता येत नाही.भारतात 19500 पेक्षा अधिक मातृभाषा आहेत हासुद्धा भारताचा इतिहासच आहे.प्रत्येकाने जर आपल्या मातृभाषेचा सटीक वापर केला तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला अनेक भाषा आपोआपच अवगत होतील व सर्वांजवळ मोठ्या प्रमाणात भाषेचा भंडार आपोआप निर्माण होईल.यामुळे प्रत्येकाचे भाषेचे ज्ञान मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल.भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की लोकसभेत किंवा राज्यसभेत काही सांसद मातृभाषा किंवा राष्ट्रीय भाषा (हिंदीचा) वापर न करता इंग्रजी भाषेचा वापर करतात यावर आंतरराष्ट्रीय मातृभाषेच्या निमित्ताने अंकुश लावण्याची गरज आहे.कारण अनेक देशांत आताही त्यांच्याच देशातील भाषा बोलल्या जाते उदाहरण द्यायचे झाले तर जापान,चीन,स्पेन,अरबी, रशिया, जर्मनी, इस्त्रायल इत्यादी अनेक.त्यामुळे भारतातील प्रत्येक भाषेला महत्व देण्याची आवश्यकता आहे.मी देशातील जनतेला हेच सांगु इच्छितो की इंग्रजी भाषेऐवजी मातृभाषा किंवा राष्ट्रीय भाषेचा उपयोग जास्तीत जास्त केला तर येणारी पीढी याचे स्वागतच करेल.आंतराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून जगातील संपूर्ण देशांनी निसर्गाची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे भूकंप व वाढत्या तापमानामुळे समुद्राची पातळी वाढने यामुळे पृथ्वीमातेचे संतुलन डगमगत आहे.याकरीता सर्वांनीच वृक्ष लागवडीचा संकल्प घ्यायला हवा.कारण आज ज्याप्रमाणे गरज आहे मातृभाषेच्या रक्षणाची त्याचप्रमाणे पृथ्वी ही सर्वांचीच माता आहे तीला वाचविण्यासाठी भारतासह जगभरातील संपूर्ण देशांनी मोठ्या प्रमाणात सर्वच स्तरातून वृक्षारोपण होणे अत्यंत गरजेचे आहे.
रमेश कृष्णराव लांजेवार