जालना – अंबड येथे वाळू माफियाने काल तहसीलदारांच्या केबिनमध्ये घुसून अरेरावी करत केला हल्ला केला आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्याभरातील तहसील कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
जो पर्यंत या हल्ल्लेखोरावर कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या अधिकारी व कर्मचार्यांनी घेतला आहे.
अंबडचे तहसीलदार विदयाचरण जगन्नाथ कडवकर हे (दि.२२) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या तहसील कार्यालयातील कक्षात शेतीच्या सुणावनीचे अर्धन्यायीक कामकाजाचे अनुषंगाने अँटी चेंबरमध्ये संबंधीत संचिका पाहत असतांना तहसिलदार कक्षासमोर असलेल्या शिपाई विकास डोळसे व जीवन म्हस्के यांनी पंकज सोळुंके रा.गोंदी यास थांबण्याचे सांगीतले असता तो न थाबंता तहसीलदार यांच्या अँटी चेंबरमध्ये आला व ” तु माझा फोन का उचलत नाही,तु काल आमचे गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु साठा का जप्त केला. तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल का केला म्हणुन शिवीगाळ करु लागला.” त्याचा अवतार पाहता तो हल्ला करेल असे वाटल्याने तहसीलदार कक्षात आले तिथेही तो त्यांच्या मागेच आल्याने तहसीलदार कक्षाचे बाहेर पडले व कोरीडोर मध्ये आले.तिथून ते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना फोन लावत असतानाच ,तु कोणाला फोन लावायला, तु माझा फेरफार का मंजुर केला नाही असे म्हणुन त्याने तहसीलदारांना मारहाण केली.
दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ३२३, ३५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जो पर्यंत हल्लेखोरावर कारवाई होत नाही, तो पर्यंत कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू आहे.