जालना- एका कार्यालयाच्या वार्षीक लेखापरिक्षण अहवालामध्ये आक्षेप मुद्दा न काढता चांगला अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजाराची लाच स्वीकारतांना जालना येथील स्थानिक निधी लेखा विभाग जालनाचे सहाय्यक लेखा
परिक्षा अधिकारी मारूती हुलाजी पपुलवार यांना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.आज २३ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत तक्रारदाराने औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाच घेतांना पकडण्यात आलेला मारूती हुलाजी पपुलवार हा स्थानिक निधी लेखा विभागात वर्ग २ चा सहाय्यक लेखा परिक्षा अधिकारी आहे. तक्रारदार यांच्या कार्यालयाचे सहा. लेखाधिकारी मारूती पपुलवार यांनी वार्षीक लेखा परिक्षण केले, त्या अहवालामध्ये लेखा आक्षेप (मुद्दा) न काढता चांगला अहवाल देण्यासाठी सहा. लेखाधिकारी मारूती पपुलवार यांनी ३५ हजार रूपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदार यांची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद कार्यालयात तक्रार केली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी जालना येथे सापळा रचून तक्रारदारा कडून ३५ हजाराची लाच घेतांना सहा. लेखाधिकारी मारूती हुलाजी पपुलवार यांना रंगेहाथ पकडले.
औरंगाबादचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपअधिक्षक केवलसिंग गुसिेंगे,सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप राजपुत, शिरीष वाघ, चांगदेव बागुल यांनी हा सापळा यशस्वी करण्याची कामगिरी केली.