जालना(प्रतिनिधी)- येथील ह्युमन चाईल्ड वेलफेअर अँण्ड एज्यु. सोसयटी द्वारा संचलीत सेन्ट मेरी इंग्लीश स्कुल, डॉ. रफीक जकेरीया उर्दू प्रा. स्कुल, व शहीद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कुल या शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन शितल गार्डन या ठिकाणी उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन युवा नेते अक्षय गोरंट्याल यांचे हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रमुख अब्दुल अफीक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण वाढेकर, नगर सेवक आमेर पाशा, सामाजिक कार्यकर्ते चौधरी ब्लड डोनर ग्रुपचे गणेश चौधरी, युवा काँग्रेसचे वसीम शेख, वजाहत खान, नॅशनल एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष काझी नईमोद्दीन, आशफोद्दीन, अजमल सिद्दीकी (औरंगाबाद), मोहम्मद दानिश, निसार खान, सेवादलचे तालुका सय्यद मुन्शी, सलमान शेख, फैज खान, झुल्फिकार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आपले विचार व्यक्त करतांना युवानेते अक्षय गोरंट्याल म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांच्या
टॅलेन्टवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रांत यशस्वी होतील. तसेच पालकांनी कायम शाळेचे संस्था प्रमुख, शिक्षक यांच्या संपर्कात राहावे. शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही अडचणी असल्यास संस्था प्रमुख व सर्व शिक्षक कायमच तत्पर असतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा म्हणाले की, संस्था अध्यक्ष अब्दुल रफिक़ यांनी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी जालना शहरात उर्दू व इंग्रजी माध्यम शाळा उघडून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. शाळेतील विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत, याचा आम्हांला अभिमान आहे.
नगरसेवक आमेर पाशा म्हणाले की, केंद्र सरकारने जेव्हा अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली तेव्हा आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात संस्था प्रमुख अब्दुल रफिक यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर संस्थेच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी एहसान जाफरी शाळेच्या हनिफ शेख शरीफ, महंमद माज मुसा, शेख हनिफ शरीफ, खान अरीब नजीर,नूर अहेमद शेख जुबेर, अबुजर सय्यद समीर जुबेर खान जाफर यांनी नृत्य व नाटकाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तर सेंट मेरी शाळेच्या मिसबा, आरेषा, इकारा, मरियम, रिझवान , दानिश आदी विद्यर्थ्यांनी उत्कृष्ट गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी संस्थेचे सचिव मुख्याध्यापिका काझी फरीदा जबीन, श्रीमती मिर्झा शबाना बेग, शिक्षक अन्सारी काशेफ, देशमुख वहिद, एकबाल शेख, मो. मुद्दसिर, अस्लम शेख, मुख्याध्यापिका अन्सारी नाझीया, शिक्षिका शबाना शाहिन, तब्बसुम शेख, अस्मा शेख, मोहमीन गुलअफरोझ, सबा अंजुम, यास्मिन शेख, उजमा पठाण, शिक्षिका अश्मिरा, शिक्षिका सरोहर यांनी परिश्रम घेतले.