ऑक्टोबर महिन्यात धोपटेश्वर परिसरातील तारा सुनील शेळके यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गोठ्यात चारा टाकण्यासाठी गेल्यानंतर म्हशीने पोटात लाथ मारून अंगावर गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले. मात्र हरसुल व बेगमपुरा पोलिसांच्या तपासात तारा यांचा मृत्यूचे गुढ समोर आले आहे.
शहरातील जटवाडा रोडवरील होणारी नगरात एका फ्लॅटमध्येच अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. आधीच्या दोन मुली असताना केवळ मुलाच्या हव्यासापोटी तिसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा या ठिकाणी गर्भपात केला गेला. यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
१२ ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अवैध गर्भपात करणारा डॉक्टरांनी नर्स विरुद्ध आता बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. श्याम जयस्वाल व नर्स सविता थोरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मागील महिन्याभरात औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपातामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.