जालना – भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथील वच्छलाबाई बळीराम साळवे यांचे दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 12.15 वाजेच्या सुमारास अप्लशा अजाराने निधन झाले.
मृत्यु समयी त्यांचे वय 82 होते. त्यांच्यावर जानेफळ गायकवाड येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. 25 फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाश्चात 3 मुलं, 4 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.