संध्याकाळची वेळ होती आणि भरधाव वेगाने गाडी निघाली होती. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदात रस्त्याकडचे दृश्य डोळ्यासमोरून निघून जात होते. रस्ता कधी सरून गेला काही कळतच नव्हते हळूहळू रात्र व्हायला लागली आणि गाडी टोल नाक्यावर येवून पोहचली मग कुठे ये जा करणाऱ्या गाड्या आणि टोल वर थांबलेल्या लोकांची जगण्यासाठीची लगबग दिसू लागली तास न तास दिवसभर ऊन, वारा,पाऊस, थंडी सगळे काही ॲक्सेप्ट करून जो तो संघर्ष करत होता.
अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला जगण्यासाठी संघर्ष अजून ही सुरूच आहे म्हणायचा फक्त प्रत्येकाचा झोन वेगळा आहे नाही का?स्त्रियांचं ही तेच आहे अजूनही एवढी प्रगत महिला त्याच त्याच रूढी, परंपरा,जबाबदारी मध्ये गुर्फुटून गेली आहे.. नवीन अस काहीच नाही अर्थात तुम्ही शिकलात, इंडिपेंडंट आहात तरी अजून ही ऑफिस सुटायची वेळ झाली की मनात हुरहूर लागतेच ना घराची,एवढ्याशा छोट्या बाळाला दिवसभर सोडून जाताना काय काळीज तुटत असेल तिचं?सगळे काही इमोशनल करून टाकणार आहे म्हणजे किती ही ठरवलं की ,”बी प्रॅक्टीकल”तरी होतो का आपण ? छे, ते आपल्याला जमणार नाही.. कारण आपण ॲक्सेप्ट करत नाही .आपण असे नाहीच आहोत, एक चौकट आखून ठेवलेली आहे .आपण आपल्या आयुष्यात काहीही केलं तरी याच्या बाहेर जावून काही नाही करायचं बस एवढे आहे खूप आहे हो ना.
जगातील प्रत्येक स्त्री मग ती इतिहासातील असो किंवा आधुनिक काळातील असो तिच्या त्याच जबाबदाऱ्या आहेत आणि ती उत्तम रित्या पार पाडते याचा अभिमान आहेच. पण कधी कधी वाटतं की आपण स्वतःच खूप लिमिटेड जग करून ठेवलं आहे. म्हणजे बघा जर जिजाऊसाहेब शिवाजी महाराजांना एक किल्ला जिंकल्यानंतर म्हटल्या असत्या की, “आता बास खूप केलं तुम्ही”… प्रत्येक वेळी नवीन स्वप्न दाखवत होत्या त्या अन् महाराज ते पूर्ण करत गेले आणि स्वराज्य स्थापन केले.. म्हणून अस वाटत की जे काही तुम्ही मिळवलेले आहे, जे आहे ते तर ॲक्सेप्ट केलच पाहिजे आणि अजून पुढे काही चांगलं करायचं आहे त्याच्यासाठी ही प्रयत्न केला पाहिजे.
खूप स्त्रिया आहेत ज्या खूप स्वप्न बघतात आणि कष्ट ही खूप करतात अर्थात केलं पण पाहिजे बिकॉज इट्स पार्ट ऑफ लाईफ… मला अस वाटतं की जगणं ही नेव्हर एडिंग प्रोसेस आहे लाईक जलचक्र.. सर्व काही सुरू राहते फक्त ऋतू बदलतात आणि आयुष्यात फक्त दिवस बदलतात कधी चांगले तर कधी वाईट म्हणून ॲक्सेप्ट करा , स्वप्न बघा आणि छान जगा.
लेखिका: लीना निकाळजे