जालना : येथील अग्रशक्ती बहु मंडळ आणि नारायण सेवा संस्थान उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि . 14 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत छञपती संभाजी महाराज नगर परिसरातील हॉटेल बगडिया इंटरनॅशनल येथे दिव्यांग व पोलीओ ग्रस्तांसाठी मोफत तपासणी तसेच कृञिम अवयव प्रत्यारोपण शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्षा आयुषी बगडिया यांनी मंगळवारी ( ता. 28) पञकार परिषदेत दिली.
शिबिराच्या आयोजनाविषयी अधिक माहिती देतांना आयुषी बगडिया यांनी सांगितले की, मंडळातर्फे गतवर्षी गरजवंतांसाठी घेतलेल्या शिबीरात 70 लाभार्थ्यांना जयपूर फूट वितरित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा उदयपूर येथील नारायण सेवा संस्थांनच्या मदतीने आयोजित सदर शिबीरात दिव्यांगांच्या तपासणी सह नैसर्गिक आपत्ती, अपघातात हात- पाय गमावलेल्या व्यक्तींना कृञिम हात- पाय प्राप्त व्हावे यासाठी 02 तज्ञ डॉक्टर व कर्मचारी तपासणी करतील. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया केली जाईल. असे आयुषी बगडिया यांनी नमूद केले.
मार्गदर्शक सारिका तालुका म्हणाल्या, कृञिम हात- पायाचे प्रत्यारोपण केल्यानंतर गाडी चालविण्यासह सर्व कामे सहजपणे करता येतील. असे सांगून गरजवंतांनी दि. 11 मार्च 2023 पर्यंत 702087423,9595479111,7499082109, या क्रमांकांवर सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस मंडळाच्या सचिव शितल अग्रवाल, कोषाध्यक्षा स्नेहा भारुका, उपाध्यक्षा रिता अग्रवाल, सहसचिव मेघा बगडिया, प्रकल्प प्रमुख संध्या अग्रवाल, ममता गुप्ता, प्रित्ती मल्लावत,पुजा तवरावाला यांची उपस्थिती होती.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978