जनता हायस्कूल जालना येथे डॉक्टर सी व्ही वेंकटरमण यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. तसेच विज्ञानाचे मानवी जीवनात महत्त्व व वापर कसा करावा या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आली. विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये विविध उदाहरणांच्या माध्यमातून अंधश्रद्धा कशी पसरवली जाते याचीही माहिती देण्यात आली. विज्ञान शिक्षक संतोष गंडाळ व श्रीमती अनिता पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव सर श्रीमती अनिता पवार मॅडम,वंदना सोनवणे मॅडम, पवन जोशी सर, संतोष गंडाळ, बाबासाहेब पवार, विष्णू पवार, सुधीर वाघमारे व संदीप तोडावत यांची उपस्थिती होती.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978