काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. सोनिया यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ताप आल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना २ मार्चला म्हणजेच गुरुवारी ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.