जालना : शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या काठावर मृत माशांचा खच सापडून आला. यावेळी पाण्यावर मृत झालेल्या माशा तरंगताना देखील आढळून आल्या. त्यामुळे या तलावात दुषीत पाणी आणि जैव विविधतेला धोका निर्माण करणारे घटक परसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
तळ्याच्या पाळूला अक्षरश मृत्यू झालेल्या माशांचा खच बघायला मिळत आहे. या तलावात दुषील घटक सोडला गेल्याने या माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. दि. 3 मार्च रोजी आज दुपारी 3 च्या सुमारास हजारो माश्या तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून येऊ लागल्या. माश्यांचा मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या तलावात आणि परिसरात दुषीत द्रव अथवा दुषीत घटक सोडला गेल्यानेच माश्याच्या मृत्यू झालाय असा प्रथम दर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे पालिका प्रशासनाने तलाव परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जवळपास तलावात 4 टन माशा असल्याचे मच्छि बीज टाकणार्या गुत्तेदारकडून सांगण्यात येत असून या माशांच्या मृत्युमुळे त्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार
जालना शहरातील मोती तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. या तलावात हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पशुधन विभागाच्या एका पथकाने मेलेल्या माशांचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. डॉक्टरांनी या माशांची तपासणी करत शवविच्छेदन केले. मृत माशांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय झांबरे यांनी सांगितले आहे. मोती तलावातच्या काही भागातून औद्योगीक कंपनीचे दुषीत पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. पंरतु, ते दुषीत पाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. शिवाय दुषीत पाणी सोडणार्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.