मुरूड जंजिरा(सौ नैनिता कर्णिक) – नेताजी पालकर मंडळ, चौक तर्फे दिवंगत जेष्ठ पत्रकार जेष्ठ पत्रकार जेष्ठ रा. भरतुक यांच्या स्मृती दिनानिमित्त व भारताच्या.स्वातंत्र्याच्च्या अमृतमहोत्सव (७५) वर्ष निमित्याने “सिद्धखेडचे हुतात्मे भाई कोतवाल व हिराजी पाटील” या विषयावर राज्यस्तरीय खुला गट व शालेय विद्यार्थ्यांसाठी उंबरखिंड विजय या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी उंबरखिंडचा संग्राम व विजय ” या विषयावर दिवंगत भागूबाई गोपाळ सकपाळ स्मृती प्रीत्यर्थ निबंध स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा बक्षिस समारंभासाठी हनुमान प्रासादिक भजनी मंडळ चौकचे अध्यक्ष हरी महाराज माळी, रायगड भूषण संघटक यशवंत सकपाळ गोविंदराव पिंपळगावकर,राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय जिवा सेना,वसंतराव कोळंबे,जेष्ठ इतिहास संशोधक गिरीशजी कंठे,कार्यकर्ते अनिल खंडागळे,इतिहास अभ्यासक व परीक्षक अशोक मोरे,अनिल भरतुक पत्रकार, स्पर्धा प्रमुख भूषण पिंगळे , सेवानिवृत्त तहसील दार नयन कर्णिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सिद्धखेडचे हुतात्मे भाई कोतवाल- हिराजी पाटील यातील शालेय गटात पहिला क्रमांक पुजा महेश महाडिक दुसरा क्रमांक प्रचिती हनुमंत मालकर तिसरा क्रमांक कृत्तिका मंगेश शिंदे चौथा क्रमांक ज्या लढ्यात शेख पाचवा क्रमांक दिया संतोष कुरंगळे मोठा गट पहिला क्रमांक प्रतिभा सुधीर पोतदार दुसरा क्रमांक नैनिता नरेश कर्णिक तिसरा क्रमांक देविदास गणपत म्हात्रे चौथा क्रमांक संपदा राजेश देशपांडे पाचवा क्रमांक विजय हरिभाऊ कोंडीलकर तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते तन्वी खारकर ,सृष्टी नाईक,भक्ती गायकवाड,जयश्री कोईनकर,जीया लखीमले भैरवी जानकर,नियती खंडागळे,रिया कुडके मान्यवरांकडून विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले .मनोगतात
यावेळी प्रथम येणाऱ्या स्पर्धकांची भाषणे झाली.नैनिता कर्णिक यांनीही मनोगतात आपल्या सत्काराबद्दल आयोजक व संयोजक यांचे आभार मानून शिवरायांविषयी माहिती कथन केली. अशोक मोरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार, स्पर्धक ,विद्यार्थी ,ग्रामस्थ या सर्वाचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.