Friday, April 17, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी –अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

हिरकणी टीम by हिरकणी टीम
March 9, 2023 2:59 PM
A A
मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी –अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार
100
VIEWS

मुंबई, दि. ८: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांसह प्रस्तावित कामांना देखील गती द्यावी, विशेषतः बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी महानगरपालिकेची प्रमाणित कार्यपद्धती लवकरात लवकर तयार करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आज (दिनांक ८ मार्च २०२३) महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, विशेष कार्य अधिकारी  सुनील सरदार यांच्यासह विकास व नियोजन, रस्ते व वाहतूक, यांत्रिकी व विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बेस्ट उपक्रम इत्यादी खात्यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने यापूर्वीच दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तथापि अलीकडील हवा प्रदूषण नियंत्रणाची गरज लक्षात घेता अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नव्याने काही बाबी समाविष्ट केल्या आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्वच बाबींचा एकंदरीत आढावा या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले की, हवेचा गुणवत्ता स्तर खालावण्याचे स्थितीतील प्रमुख कारण्यांपैकी एक कारण धूळ हे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धूळ नियंत्रणाची कार्यवाही होत असली तरी मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन राहून मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रण संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तातडीने निश्चित करावी. तसेच याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी व सर्व संबंधित भागधारक घटकांची पुढील आठवड्यात कार्यशाळा आयोजित करून धूळ नियंत्रणाची कामे तातडीने मार्गी लागतील असे पहावे, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.

मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता नवी मुंबईमध्ये प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रांची मिळून एकूण क्षमता १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी राहणार असून त्यासंदर्भातील कार्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

त्याचप्रमाणे, रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याच धर्तीवर आता नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडू द्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर अधिकच्या रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर व वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता करू शकणारे ५० संयंत्र तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारे ५० संयंत्र असे एकूण १०० वाहन आरूढ १०० संयंत्र खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही देखील सुरु आहे. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ चार्जिंग स्टेशन उभारली गेली आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शासनाच्या सूचनेनुसार जुनी वापरात असलेली डिझेलवर धावणारी वाहने सीएनजी मध्ये रूपांतरित करून घेण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ६५२ वाहतूक दिवे चौक (ट्रॅफिक सिग्नल जंक्शन) पैकी आतापर्यंत २५८ वाहतूक दिवे चौक हे स्वयंचलित पद्धतीने कार्यरत करण्यात आले आहेत. उर्वरित वाहतूक दिवे चौक देखील टप्प्याटप्प्याने स्वयंचलित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून २०२३ पर्यंत त्यांच्याकडून अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

घनकचऱ्यातून उद्भवणाऱ्या हवा प्रदूषणाविषयी देखील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी संपूर्ण आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने देवनार क्षेपणाभूमी येथे ६०० टन प्रतिदिन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याद्वारे ४ मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये तो कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने ओशिवरा, धारावी आणि मालाड येथे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी आठ ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र सुरू करण्यात येणार असून या नवीन आठ केंद्राद्वारे प्रत्येकी दररोज सुमारे ४ टन म्हणजे दररोज एकूण ३२ टन घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन केंद्रासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ११ ठिकाणी तर भारतीय हवामान खात्याकडून ‘सफर’ अंतर्गत ९ ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आता शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. सदर पाचही केंद्र दिनांक १५ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.

Previous Post

राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव
जालना - छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जालना - छत्रपती संभाजीनगर

नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

December 13, 2025
104
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी
जालना - छत्रपती संभाजीनगर

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
130
Next Post
विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.