जालना (प्रतिनिधी) शहरातील भाग्यनगर येथील संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दि. 11 मार्च 2023 रोजी नागसेन ग्रंथालयास क्षेत्र भेट दिली. यावेळी ग्रंथालयात येणार्या सर्व दैनिक वृत्तपत्र, मासिके, बालसाहित्य, विज्ञान कथा, संत साहित्य, विविध ग्रंथाचे वाचन केले.
यावेळी रेवा रामदासी, अनुष्का दुग्धेकर, स्वरा दसमले, अंवतीका तळेकर, सुमेध देशपांडे, शालिनी पुंगळे या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. ग्रंथ म्हणजे काय? नागसेन ग्रंथालय अ दर्जा का? ग्रंथालयास नागसेन नाव का दिले? ग्रंथालयात एकूण किती ग्रंथ आहेत? आम्हाला घरी वाचण्या साठी ग्रंथ नेता येईल का? सुट्टीत ग्रंथालयात बसून वाचन करता येईल का? ग्रंथाचे जीवनात काय महत्व आहे? ग्रंथ का वाचायचे? ग्रंथालय किती वेळ सुरू रहाते, ग्रंथालयास सुट्टी कधी असते. अशा अनेक प्रश्नांना नागसेन ग्रंथालय अध्यक्ष राजेश ओ. राऊत यांनी समर्पक उत्तरे दिली.
या प्रसंगी संस्कार प्रबोधनी चे शिक्षक रावस अनिता एम., बोधक पी. ए., कोपे आर. एम., बोरगांवकर एम.व्ही., देशमुख के. एल., दळे मावशी, अंजली मुळे, विनोद भगत, महेंद्र रतनपारखे, आकाश गवळी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन कार्यक्रमाचा समरोप करण्यात आला.