जालना (प्रतिनिधी) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले जळगाव जामोद मतदार संघाचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून संतोष रमेशराव शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला.
यावेळी जिल्हा महिला व बाल रुग्णालय जालना येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तर काजळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य व वॉटरबॅग वाटप करण्यात आले. यावेळी आयोजक संतोष रमेशराव शिंदे, काजळा गावाचे सरपंच प्रकाश गावडे, अॅड. राम कुर्हाडे, लक्ष्मण कुर्हाडे, रमेश गोलडे, शिंदे मामा, संतोष रमेशराव शिंदे, सुधाकर मोरे, शिवहार कलाने, शिवाजी राठोड, किशोर पाखरे यांची उपस्थिती होती.