जुनी पेन्शन योजना लागू करावी या व इतर मागण्यासाठी 14 मार्च 2023 पासून राज्यातील सर्वच विभागाच्या कर्मचार्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात 80 टक्के कर्मचारी सहभागी झाले होते. शिवाय राहीलेल्या 20 टक्के कर्मचार्यांनी देखील उडी घेतली असून 100 टक्के कर्मचारी आता संपात सहभागी होणार आहेत.
शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात शासनाला पत्र दिले असून 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेत गार्डींग करण्यास नकार दिला आहे. तसे पत्र कस्टडीयन यांना सादर करण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचा परिणाम हा विद्यार्थी आणि सर्वसामान्यावर होत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अधिक ताज्या बातम्या वाचन्यासाठी आणि विडीओ पाहण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करुन हिरकणी अॅप डाऊनलोड करा… सोबतच हिरकणी न्यूज चॅनलला सब्सक्राईल नक्की करा…
अधिक ताज्या बातम्या वाचन्यासाठी आणि विडीओ पाहण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करुन हिरकणी अॅप डाऊनलोड करा… सोबतच हिरकणी न्यूज चॅनलला सब्सक्राईल नक्की करा…