आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी,हसतमुख जगणारी, स्वप्न बघणारी, अभ्यास करणारी ही आजची तरुण पिढी कुठेतरी हरवून बसली आहे.. फोन म्हणजे आयुष्य झालं आहे त्यांच्यासाठी.. आपल्या आजूबाजूला, घरात, देशात, जगात हे सोडाच पण स्वतःच काय चाललं आहे हेच समजत नाही त्यांना आहे ना थोड तरी विचार करण्यासारखे.. अगदी सेकंदात आयुष्य संपवून टाकतात कोणताच विचार न करता.. आपल्या बाळांवर जीव ओवाळून टाकणारे आई वडील ,आपल्या प्रत्येक अडी – अडचणीच्या वेळी मदत करणारे नातेवाईक असतील ,मित्र असतील हे आपलेच आहेत आणि आपण त्यांचेच आहोत ही भावना त्यांच्यात नाहीच आहे..
सुट्टीचे दिवस आहेत आपल्याला काय करायचे आहे कुठे जायचं आहे याचा plan करा ,स्वप्न बघा, तुमची आवड जपा,व्यायाम करा,जे आवडेल त्या गोष्टी करा.. फोन च्या मोहमाया दुनियेत गुरफटून जावून त्यात अडकु नका.. मोबाईल हा तुमच्यासाठी आहे तुम्ही मोबाईलसाठी नाही हे लक्षात ठेवा आणि आयुष्य मोबाईल करून घेवू नका,तुम्हाला कोणी बोलत असेल फोन करत नाही बोलत नाही सरळ सांगा अगोदर फोन नव्हते .. कोणाची वाट बघू नका कोणत्याच गोष्टींसाठी , स्वतःसाठी जगा लोकांनी सेल्फिश म्हटल तरी चालेल.. तुमच्यावर प्रेम करणारी,काळजी घेणारी भरपूर लोक आहेत याच भान ठेवून जगा आणि अगदीच तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या आहारी गेला असाल तरी कोणालाही न घाबरता बाहेर पडा कोणाचाही विचार न करता .. तुमचा ज्यांनी सांभाळ केला आहे ,त्यांना तुमच्या असण्याने आणि नसण्याने खूप फरक पडतो याची जाणीव तुमच्या मध्ये असूद्या.. घरी ,जे प्रॉब्लेम आहेत त्यावर निसंकोचपणे बोला कोणासोबत ही शेअर करा , बिन्धास्त भांडा ,मोठमोठ्याने ओरडा , ओक्साबोक्सी रडा,स्वतःसाठी बोला, कोणाचाही त्रास सहन करू नका . कोणी अपमान केला असेल ,वाईट बोललं असेल तर सोडून द्यायला शिका ,कोणी तुम्हाला कसं ही ट्रीट करुद्या “यु ह्याव टू स्टँड लाईक अ माउंटन”.. पण खोटं खोटं आनंदी राहवून दुसऱ्यांना हसवून स्वतःला आणि तुमच्यावर जीव लावणाऱ्या लोकांना फसवून जावू नका बिकॉज इट किल्स देम डे बाय डे.पालकांनीही मुलांचे खूप लाड करू नका त्यांना हवं ते वेळेवर देवू नका, अशाने त्यांच्यात पेशन्स राहत नाही. लोकांना आणि परिस्थितीला सामोरं जाण्याची धमक त्यांच्यात राहत नाही ..
आयुष्य एकदाच आहे ते छान जगा.. स्वतःसाठी नसेल जगायचं तर तुमच्या आई वडिलांसाठी आणि प्रेम करणाऱ्या माणसांसाठी जगा.. तुम्हाला सगळ काही मिळेल पण तुमच्या आई वडीलांना तुम्ही आणि तुम्हाला तुमचे आई वडील कधीच मिळणार नाहीत ही खूणगाठ मनाशी बांधूनच प्रत्येक निर्णय घ्या… खूप त्रास असेल, डिप्रेशन असेल,negative vibes येत असतील कोणाचा दबाव असेल तरी त्यातून मार्ग निघेल.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा तुम्ही कसेही असूद्या तुम्हाला कधी डिप्रेशन आणि बऱ्याच काही प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागणारच नाही म्हणून स्वतःची काळजी घ्या .खुश राहा ,तुम्ही खुश तर सगळे खुश…..
लेखिका: लीना निकाळजे