जालना (प्रतिनिधी) – महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ (ऊछए 132) च्या राज्य कार्यकारिणीची बैठक दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वा. जालना येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार आहे. ही बैठक महासंघाचे राज्याध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी चे उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यभरातून सर्व प्रवर्ग संघटनेचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस व राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
एकच मिशन जुनी पेन्शन यासाठी 14 मार्चपासून आयोजित केलेल्या भव्य राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानुषंगाने न्याय तत्त्वाने उपाययोजना करण्या संदर्भात शासनाने समिती गठित केली. सदर समितीला जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील पुरावे देऊन, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभिप्राय व मते द्यावयाचे आहेत. तसेच नाशिक येथे झालेल्या राज्य अधिवेशनानंतर महासंघाची ही पहिलीच राज्यस्तरीय बैठक आहे. यावेळी सर्व संवर्गाच्या प्रश्नांबाबत चर्चा व निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीस जालना जिल्ह्यातील जिल्हा परीषदेच्या सर्व संवर्ग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष प्रवीण पवार यांनी केले आहे.