खालापूर (कु. अदिती पवार) :- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेत्या सुष्माताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यभरात “महाप्रबोधन यात्रा” काढण्यात येत असून ही महाप्रबोधन यात्रा दि. 29 एप्रिल 2023, शनिवार रोजी खालापूर तालुक्यात पोहचणार आहे.
या यात्रेच्या पूर्व नियोजना संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा उपप्रमुख नितीन सावंत, कर्जत-खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख तथा खोपोली शहर प्रमुख डॉं. सुनील गोटीराम पाटील, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या महाप्रबोधन यात्रेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत-खालापूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उपस्थित नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता सभा होणार असून शिवसेना नेत्या सुष्माताई अंधारे, कामगार नेते सचिन अहिर, अल्ताफ शेख, पेडणेकर आदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या यात्रेसाठी ठिकठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून दि. 29 एप्रिल 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा खोपोली येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी पोहचेल, तरी उपस्थितीचे आवाहन जिल्हा उपप्रमुख नितीन सावंत, कर्जत-खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख तथा खोपोली शहर प्रमुख डॉं. सुनील गोटीराम पाटील, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.