आयुष्यात कोणत्याही वाटेवर, सुख दुःखाच्या लाटेवर हळुवार किनारा गाठायला शिकवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अर्थातच आपली आई. आपण बाहेरून घरात आलो की आपली पहिली नजर आईला शोधत असते आणि जेव्हा आपण तिच्यासोबत असतो तेव्हा आपण नेहमी सेफ झोन मध्ये असतो लाईक अ पर्ल इन् द शेल. जसे जसे आपण तिच्यापासून दूर जातो स्पेशली लग्न करून, मग हळू हळू जग कळू लागत तशी ती पदोपदी आठवते आणि मग जड अंःकरणाने आपण म्हणतो की “आई,तुझी खूप आठवण येते.. तुला खूप त्रास दिला आहे, आय एम सॉरी”.
आई म्हणजे प्रत्येक मुलाचं प्रेम,मुलीची मैत्रीण,नवऱ्याची अर्धांगिनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचा समुद्र असते नाही का? कस जमतं तिला सर्वांवर भरभरून प्रेम करायला ,काळजी घ्यायला? तिच्याशी कोणी कसही वागो ती मात्र तिची जबाबदारी चोख निभावत असते अगदी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी.. पण या मदर्स डे ला आय विश ,” जगात कोणाच्या आईवर कधीच दुःखाची सावट पडू नये ,सर्वांची आई कायम खुश आणि सुखी समाधानी असावी कारण आई खुश तर बाळ खुश”.आईसारखे सुंदर आणि निरपेक्ष प्रेम करणारं ,काळजी घेणारं,आपल्यासाठी आपण झोपेतून उठण्यापूर्वी खायला बनवणारं,आपले आजारपण काढणारं तिच्याशिवाय कोणीच नसतं आणि कदाचित हे तिलाही माहीत असावं म्हणूनच ती आपल्याला लहानपणापासून सक्षम बनविण्याचे धडे देत असावी.
पूर्वी आई ही फक्त घर,मुले आणि नातेवाईक यातच गुंतलेली असायची तिला तिचं घर आणि आलेले पै-पाहुणे सगळ्यांसाठी जगणं हेच तीच जग. आई तेव्हा ही फिनान्सियली इंडिपेंडंट होत्या ,जरी त्या घराबाहेर जावून जॉब करत नसल्या तरीही त्या शिवणकाम,पशुपालन ,कुकुटपलान, किराणा दुकान,मसाले विकणे हे छोटे मोठे व्यवसाय करून थोडीफार मदत आणि बचत करत होत्या. भले आजकाल जग मॉडर्न झाले आहे आणि तशीच मॉडर्न आई,पण तिच्यात असणारी आई ही आईच आहे .अगदी जॉब करून ,घर सांभाळून ,मुलाचं डे केअर, स्कूल मधील मुलांचा स्टडी ,तिचे छंद हे सगळे करून ती ही सुपर मॉम आहेच की.. म्हणूनच आई ही शिकलेली असो किंवा नसो आई ही फक्त आईच असते आणि तिचं आपल्या आयुष्यात असणार स्थान कोणीही घेवू शकत नाही म्हणून सर्व आईंना मातृ दिनाच्या खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम!!!
– लीना निकाळजे