वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष आढाव यांची दि. 15 जुलै 2023 रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास रामनगर येथील मंठा रोड लगत असलेल्या गायरान जमिनीमध्ये निर्घुण हत्या आल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंडे यांनी भेट दिली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
जालना शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथील मंठा रोड वर गायरान जमीन आहे. या जमीनीचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. वारंवावर या जमीनीच्या कारणावरुन हाणामार्या झालेल्या आहेत. परंतु, आज तर चक्क हत्या करुन प्रचंड दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संतोष आढाव यांना सात ते आठ लोकांनी बेदम मारहाण करून निर्घुण हत्या केल्याचे प्रत्यक्षदर्षींनी सांगीतले. तर या मारहाणीत इतर एक जन जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संतोष आढाव यांची डेड बॉडी जिल्हा सामान्य रुग्णालय शवविच्छेदनासाठी हलविण्यात आली. यावेळी जिल्हा सामान्य रग्णालयात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांनी भेट दिली असून जिल्हाध्यक्ष डेविड घुमारे, बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीष रत्नपारखे, कैलास रत्नपारखे, गौतम वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली.