पैसा इस्टेट नाव लौकिक
इथच सगळं राहतय…
किती जमवशील माणसा
काय तुझ्या सोबत येतय..?
नुसताच मोठेपणा
नुसतीच प्रसिद्धी मोठी..
चमचमणारी चंदेरी दुनया
तेवढीच वाटते खोटी..
लाईट मेरा ॲक्शन
चालु होतो अभीनय
पडद्यावरच्या शिट्ट्या टाळ्या
तातपूरता सविनय..
तुझ्या सोबत कुणीच नाही
शेवटच्या क्षणाला…
काय उपयोग संपतीचा
जाळायचं त्या धनाला…
भाडोत्री खोलीत एकटाच
जीव पहा घुटमळला …
एवढी श्रीमंती असुन सुद्धा
देह कसा दरवळला…
मुंबईचा फौजदार
एकटेपणाने गीळला…
आठवते गिताची ओळ
तुळशीराम सुतार