जुना जालना भागातील कांचन नगर येथे राहणाऱ्या 53 वर्षांच्या लताबाई केशवराव इंगळे या दिनांक ३० जुलै रोजी दुपारी २:३० वाजणेचे सुमारास भोकरदन येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे असल्याने त्या जालना बसस्थानक येथे आल्या होत्या. त्या भोकरदन बसची बसस्थानक येथे वाट पाहू लागल्या. तेवढयात जालना सिल्लोड ही बस बसस्थानकात आली. फिर्यादी लताबाई इंगळे या बसमध्ये बसण्यासाठी जात असतांना दोन अनोळखी स्त्रीया त्या ठिकाणी आल्या. गर्दी जास्त असल्याचे दिसताच त्यांनी गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी लताबाई इंगळे हीचे गळयातील अडीच तोळेची गहुमणी वर्णनाची सोन्याची पोत किमती दिड लाख रुपयांची (१,५०,०००/-) दोन अज्ञात स्त्रियापैकी एकीने बळबजरीने हिसका देवून तोडुन घेवुन गर्दीचा फायदा घेत बसस्थानक येथून पळुन गेल्या. दोन्ही अज्ञात स्त्रिया पळुन गेल्याने फिर्यादी लताबाई या बसस्थानक चौकी येथे डयुटीला हजर असलेले पोलीस अंमलदार यांना त्यांचे सोबत घडलेली घटना सांगत असतांना दुसरी एक बाई सुष्मा गोंविद कुरे रा. डोबीवली ता. कल्याण जि. ठाणे व तीची मुलगी यापण पोलीस चौकी येथे येवुन त्यांचे गळयातील एक तोळयाची सोन्याची पोत किंमती ६०,०००हजार रुपयेची ही दोन अज्ञात स्त्रीयांनी बळजबरीने हिसका देवुन तोडुन गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेल्याचे सांगीतले.
सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तात्काळ सदर गुन्हा उघड करुन महिला आरोपिंना तात्काळ अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना डि.बी. पथकास दिल्या.डि.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, सहा. पोउपनि मांटे, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, पोहेकॉ जगन्नाथ जाधव, पोहेकॉ सोमनाथ उबाळे, पोहेकॉ कावळे, पोकों भुतेकर, चालक सहा. पोउपनि हिवाळे, मपोहेकॉ मनिषा पोळ यांनी नमुद महीला आरोपीतांचा पोलीस ठाणे हददीत शोध सुरु केला. पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी व त्याचे टिमने गोपनीय माहीतीच्या आधारे दोन संशयीत महीलांना भोकरदन नाका चौकी परिसरातून ताब्यात घेवुन पोलीस ठाणे सदर बाजार येथे आणले. त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने विचारपुस करता त्यांनी सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे देण्यास सरुवात केली. परंतु दोन्ही संशयीत स्त्रीयांकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्या अडखळत बोलत होत्या. त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. दोन्ही महीला आरोपीतांची दोन पंचासमक्ष महीला अंमलदार मनिषा पोळ यांनी अंगझडती घेतली असता आरोपी कवीता काळे हीचे अंगझडतीत एक सोन्याची फिर्यादीची किमती १,५०,०००/- रुपयाची पोत मिळुन आली.
ती दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. दोन्ही महीला आरोपीतांची नावे १. कवीता गमतीदास काळे वय ३० वर्षे रा. राजनगर मुकंदवाडी ता.जि ता. जि. छत्रपती संभाजी नगर २ सिमा अजय काळे वय २० वर्षे रा. राजनगर मुकंदवाडी ता. जि. छत्रपती संभाजी नगर असे आहेत. महीला आरोपी कवीता गमतीदास काळे हीचा पोलीस अभिलेख पाहता त्यांचेवर यापूर्वी गेवराई पोलीस ठाणे, नाशिक रोड पोलीस ठाणे रेल्वे पोलस ठाणे संभाजी नगर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पो.नि.प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करत आहेत. दोन्ही महीला आरोपीतांना दिनांक ३१ जुलै रोजी मा. न्यायालयात हजर केले होते. दोन्ही महीला आरोपीतांना मा. न्यायालयाने तिन दिवस पोलीस कस्टडी दिली आहे.
याद्वारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, बसस्थानक, रेल्वेस्टेशन व इतर गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागीने, पर्स, बॅग व इतर आपल्या स्वतःच्या सामानाची काळजी घ्यावी. संशयीत पुरुष, महीला दिसल्यावर तात्काळ बसस्थानक येथे डयुटीला असलेले पोलीस अंमलदार यांना कळवावे किंवा डायल ११२ कॉल करुन त्याची माहीती पोलीसांना दयावी. असं आवाहन देखील पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांनी जालन्यातील नागरिकांना केलय.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक तुषार दोषी , अपर पोलीस अधिक्षक राहुल खाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, डि.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, सहा. पोउपनि मांटे, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, पोहेकॉ जाधव, पोहेकॉ ऊबाळे, पोहेकॉ कावळे, पोकॉ भुतेकर, चालक सहा. पोउपनि हिवाळे, मपोहेकॉ मनिषा पोळ यांनी पार पाडली आहे.