दिंडूर येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ कार्यक्रम उत्साहात पार पडला असून यावेळी ग्रामसेवीका सुरेखा सरवळे यांनी उपस्थितांना पंचप्राण शपथ दिली. यावेळी सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांसह बचत गट, ग्रामस्त आणि नागरीकांची मोठ्या संख्ये उपस्थिती होती.
सरपंच सौ. गीता होळे, उप सरपंच राजकुमार घोडके, सदस्य बसवराज मिरजे, चंद्रकांत घोडके, धान्नलिंग होळे, संघप्पा जिराजदार, सीआरपी सरस्वती शिवयोगी, लक्ष्मी तुपसाखरे, सुरेखा तुपसाखरे, शिवलीला बहीरजे, वनमाला मिरजे, आरोग्य सेवीका प्रभावती उपाध्ये यांच्यासह महिला, प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत शिला फलक उभारण्यात येणार आहेत.
ज्यांनी निःस्वार्थपणे देशाची सेवा केली व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बुधवार (ता.9) पासून 15 ऑगस्टपर्यंत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या अभियानात देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंचप्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार जात आहे. अशीच प्रतिज्ञा दिंडोर येथे घेण्यात आली.