जालना : जालना शहरातील मोतीबागेच्या तळ्यावर मच्छी पकडणार्या मच्छीमाराची मच्छी चक्क एका सापानेच चोरुन नेली. चोरी गेलेली मच्छी शोधनारा हताश होऊन पुन्हा दुसर्या मच्छीच्या शोधात पाण्यात गळ टाकूण बसला. परंतु, जे काम पोलीसांनही जमनार नाही ते एका सर्पमित्राने करुन दाखविले. एका खारुताईच्या इशार्याने सर्पमित्र विशाल गायकवाड यांनी मच्छीमाराची चोरीला गेलेल्या मच्छी चा शोध लावला. तो शोध कसा लावला नक्की वाचा…
जालना शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या मोतीबागेत बदकाच्या पिल्लांना सोडण्यासाठी निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी गेले होते. त्यावेळी तळ्याच्या काठावर एक मच्छीमार गळाने माशा पकडत होता. संघटनेचे पदाधिकारी आल्याने मच्छीमाराने गळाने पकडलेल्या माशा उचलून ठेवण्यासाठी गेला. परंतु, त्याने पकडलेला मोठा मासा दिसून आला नाही, तो एवढ्या अडचणीच्या ठिकाणी काय शोधतो याची विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने सांगीतले की, मी काही वेळेपुर्वीच अर्धा किलोचा मासा पकडला होता, त्याला उचलणारच होतो, परंतु तो कुठे गेला दिसेना झाला आहे. एक तर तिथे कुणी माणसं नव्हते, जनावरं सुध्दा नव्हते, मग मासा गेला कुठे याचा शोध सुरु झाला. निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकार्यांनी देखील आजुबाजुला शोध घेतला. परंतु, मासा काही मिळून आला नाही. त्यामुळे सर्वांनी आशा सोडली आणि निघून गेले.
पंरतु, बदकाच्या पिल्लांना सोडून दिल्यानंतर परत जातांना एका झाडावरची खारुताई जोर जोरात ओरडू लागली. ती जमीनीकडे पाहुन शेपटी हालवू लागली. त्यामुळे सर्पमित्र विशाल गायकवाड यांनी खारुताई ज्या दिशेने पाहते त्याच दिशेने पहायला सुरुवात केली. त्यावेळी मोतीबागेच्या गार्डनमधील गवतात काहीतरी हालतांना दिसले. विशाल गायकवाड यांना साप दिसताच त्यांना क्षणाचाही विलंब न लावता साप पकडला. सापाला पकडल्यानंतर सापाने तोंडातून अर्धवट मच्छी बाहेर काढली. मच्छीमाराच्या तावडीतनू चोरुन आणलेली चच्छी काही क्षणातच विरघळून गेली होती. मच्छीमाराला विचारले असता त्याने देखील हीच मच्छी पकडल्याचे सांगीतले. एका सापाने मच्छीची शिकार केली आणि खारुताईने ती शिकार पकडून दिली. त्यामुळे उपस्थितांनी आश्चार्य व्यक्त केले.
यावेळी निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकार्यांचे आभार मानलेत. यावेळी विशाल गायकवाड, मयुर साबळे, शिवाजी डाकूरकर, राहुल शिंदे, सतिष पाटोळे, रॉकी गायकवाड यांची उपस्थिती होती.