जालना : जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस, इंजीनियरिंग, एम. टेक जालना आयसीटी, सीए/सीएस फाउंडेशन, सीए आयपीसीसी, सीएस एक्झिक्युटिव्ह, सीएस प्रोफेशनल, बी.फार्मसी, पॉलिटेक्निक, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी एग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी सन 2023 मध्ये प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या होतकरू व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी यांनी केले आहे.
कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारापर्यंत, दहावी किंवा बारावी शिक्षण जालना जिल्ह्यातच झालेले विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी पात्र आहेत. गेल्या दोन वर्षात 325 विद्यार्थ्यांना 47 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती योजनेसाठी https://zfrmz.eu/w2rjg1GpotjUJGSTvYWq या लिंक वर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. पात्रता आणि अधिक माहितीसाठी जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या व्यंकटेशनगरमधील कार्यालयात अथवा दिलीप केंद्रे 7020518768, रुक्मिणीकांत दीक्षित 9404607575 यांच्याशी संपर्क साधावा. गरजू व होतकरू पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे प्रा. सुरेश लाहोटी, सुनिलभाई रायठठ्ठा, सुनील गोयल, डॉ. हितेश रायठठ्ठा, दिलीप कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी- केसापूरकर, गोविंद काबरा, प्रा. ओमप्रकाश झांजरी, सपना गोयल, परेश रायठठ्ठा, प्रा. स्वप्निल सारडा यांनी केले आहे.