भंडारा : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे आजार डोके वर काढत असतात. हि साथ झपाट्याने वाढत असते. असाच भंडारा जिल्ह्यात मलेरियाची लागण झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तुमसर शहरातील सम्यक सोंनपिपरे यांचा मृत्यू झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सम्यक याची प्रकृती खराब झाल्याने त्याला स्थानीक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला डेंग्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. तसे रक्त तपासणी सुध्दा करण्यात आली होती. पण त्याची प्रकृतीमध्ये सुधार होत नसल्याने त्याला नागपुर येथे हलविण्यात आले.
यानंतर सम्यक यास नागपूर येथे नेले असता मृत्यू झाला आहे. तर त्याच्या रक्त तपासणी अहवाल आला असून मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सर्व नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावे जेणे करुन डास तयार होणारं नाही असे आव्हानं करण्यात आले.