जालना : जालना तालुक्यातील 15 गावातील 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टिच्या निकषा बाहेरी सततच्या पाऊसामुळे शेतीपीकांच्या झालेल्या नुकसानीच्या अद्यावत याद्या एक्सेल शिट न करणाऱ्या कृषी सहाय्यक यांच्या विरुद्ध अखेर तहसीलदार यांच्या आदेशानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्या तक्रारीवरून आपत्ती व्यवस्थापन काळात हलगर्जी पणा केला म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 56 व 57 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने कृषी विभागात एकच खबळ उडालीय.
नेमका काय होता हा वाद
जालना जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर 2022 च्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुदानच्या याद्या अध्यवत करण्यासाठी महसूल आणि कृषी सहाय्यक यांना काम देण्यात आले होते. मात्र याद्या अध्यवत करायच्या कुणी? या वरून महसूल विभागाच्या तलाठी आणि कृषी सहाय्यकांमध्ये
चांगलीच जुपंली होती.महसूल विभागाकडून कृषी साह्यकांना नैसर्गिक अपत्ती काळात कामचुकार पणा केल्याचा आरोप करत 26 कृषी सह्याकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तर तर कृषी साह्यकाकडून हे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे याद्या अपलोड करण्याचे काम असल्याचे स्पष्टीकरण देत शासन निर्णयाचा हवाला ही सादर करण्यात आला होता.
महसूल आणि कृषी विभागाच्या भांडणात शेतकऱ्यावर मात्र अनुदानपासून वंचीत रहाण्याची वेळ आली होती.या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेस मध्ये पत्रकारांच्या वतीने पालक मंत्री अतुल सावे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
पालक मंत्र्याच्या आदेशानुसार महसूल विभागच्या तहसीलदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांना कृषी सहाय्यक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांच्या तक्रारी वरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरील नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेवर करणे आवश्यक असल्यामुळे त्यांना नेमून दिलेले कामकरण्यास संबधीत कर्मचारी यांना नेमून दिलेल्या कामा मध्ये जाणीव पूर्वक टाळाटाळ केल्या मुळे ते भा.दं.वि. कलम 1884
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 56 व 57 नुसार शिक्षेस पात्र ठरत असल्याने तहसीलदार यांच्या आदेशावरून तालुका पोलीस ठाण्यात कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 56 वें 57 नुसार 14 सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर तालुका पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1)एम.एस. घोरपडे कृषीसहायक,
2)ए.एन. सोनवलकर कृषिसहायक,
3)व्हि.के. पुंड कृषिसहायक,
4)जी.एल. ढवळे कृषिसहायक,
5)एस. एस. काकडे कृषीसहायक,
6)जे. के. तायडे कृषीसहायक,
7)बी.जे. कदम कृषीसहायक,
8)एन.जी. राठोड कृषिसहायक,
9)बी. एल. वाघ कृषीसहायक,
10)यु.बी. बंगाळे कृषीसहायक.
11)यु.डी. खांडेभराड कृषीसहायक,
12)जी. ए. अंभोरे कृषिसहायक,
13)व्ही. आर. कुलकर्णी कृषीसहायक, 14)एस. के. भुतेकर कृषीसहायक अशी कारवाई झालेल्या कृषीसहाय्यकांची नावे आहेत.
जालना तालुक्यातील 96 गाव नैसर्गिक आपत्तीच्या निकषात बसत नसल्याने व त्यातच या 96 गावामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोंबर 2022 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हजारो शेतकऱ्याच्या हातातोडाशी आलेला घास या सततच्या पाऊसाने हेरावून घेतल्यानं.हजारो हेक्टर वरील पीक वाया गेल्यानं शासनाने पिकाच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून विशेष निधीची तरतूद केली होती. या बाबद महसूल विभागाच्या तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांना 96 गावातील बाधित शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनाम्या नुसार याद्या अध्यवत करुन त्या याद्या शासनाच्या वेबसाईट वर अपलोड करण्यासाठी बाधित शेतकऱ्याच्या आधार क्रमांक बँक खात्यासह निर्धारित वेळेत अपलोड करण्याचे आदेश महसूल प्रशासनकडून देण्यात आले होते.
दरम्यान 96 गावापैकी 26 गावांच्या याद्याचं काम हे कृषी सहाय्यकाना देण्यात आलं होते. कृषी साह्यकांनी या याद्या तयार करुन त्या महसूल विभागाला सादर ही केल्या मात्र महसूल विभागानी त्या याद्या शासनाच्या वेबसाईट का?अपलोड केल्यानाही असा थपका ठेवत कृषी सहाय्यकाना नैसर्गिक आपत्ती च्या कामात कमकुचाऱ्या पणा केल्याचा आरोप करत निष्काळजीपणा टाळाटाळ केल्याचे कारण देत 26 कृषी साह्यकांना विरुद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्याची काही दिवसापूर्वी नोटीस बजावली होती.
याच नोटीसच्या आधारे 14 सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर वरिष्ठाच्या आदेशावरून नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.