जालना : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा मीना तथा जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जिल्हा प्रयोगशाळेला भेट दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी कशी आणि कुठे केली जाते, कोण तपासतात, त्याकडे आपली शासकीय यंत्रणा लक्ष देते की नाही यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आज (दि २८ ऑगस्ट २०२३) सकाळी दहा वाजता जालनामधील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत दाखल झाले. यावेळी त्यांनी रासायनिक व जैविक पाणी नमुने यांची तपासणी कशाप्रकारे केली जाते? याबाबतचे प्रात्यक्षिक पाहिले व पाणी नमुने कुणामार्फत प्रयोगशाळेत देण्यात येतात याबाबत माहिती घेऊन पाणी नमुने वेळच्या वेळी आरोग्य सेवक व जलसुरक्षक यांनी प्रयोगशाळेत पोहोचवावेत अशा सुचना केल्या.
आतापर्यंत जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ९४९ गावांपैकी ५३० गावांचे पाणी नमुने जैविक तपासणी झाली असून, उर्वरित ४१९ गावांचे पाणी नमुने तात्काळ ग्राम सेवक व जलसुरक्षक यांनी प्रयोगशाळेत सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. अद्याप पाणी नमुने तपासणीसाठी सादर नं करणारी गावामध्ये अंबड तालुक्यातील १९ बदनापूर तालुक्यातील २७ जालना ४६ जाफ्राबाद ३२ परतूर ४६ मंठा ६४ घनसावंगी ७५ व भोकरदन तालुक्यातील ११० गावांचा समावेश आहे. सदरील गावाच्या ग्रामसेवक व जलसुरक्षक यांनी तात्काळ पाणी नमुने तपासणीसाठी नेमून दिलेल्या प्रयोगशाळेत सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बालचंद जमधडे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.प्रकाश शेलार, सहाय्यक भूवैज्ञानिक श्री.किरण कांबळे व श्री.सी.एच.गिरीधरा, श्री.राहुल भवाळ, श्री.किशोर शिंदे, श्री.धर्मराज खंडागळे, श्रीम.आर.एस.घाटोळे, श्री.गणेश शेळके, श्री.ज्ञानदेव काळे तसेच जिल्हा परिषद जालना चे पाणी गुणवत्ता तज्ञ श्री.श्रीकांत चित्राल उपस्थित होते.