जालना – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बद्दल आ. गोपीचंद पडळकर यांनी काही आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शहरातील गांधी चमन येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड,जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब चित्तेकर, राजेश पवार, तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे, युवक तालुका अध्यक्ष उमेश मोहीते, शहराध्यक्ष रोहीत अग्रवाल, अमोल खरात, निलेश रत्नपारखे, फिरोजखान, इब्राहिम खान, शेख अन्सार, विष्णू घुले, प्रविण मोहीते, राहुल साने, नवनाथ लोखंडे , लतीफ भाई, सिध्दार्थ म्हस्के, शेख सलीम यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.