जालना – शहरातील मुख्य बाजारपेठेत एका महिलेला सापडलेलं सोन्याचं बिस्कीट खरेदी करणे चांगलंच महागात पडलंय. सापडलेलं सोन्याचं बिस्कीट देण्यासाठी महिलेच्या गळ्यातील 8 ग्रॅम सोन्याच्या पोतीसह रोख 7 हजार रुपये घेऊन भामटे पसार झालेत.
कमलबाई बाबासाहेब पाचरणे रा. पानशेंद्रा या त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावी जात असतांना त्या सिंधीबाजारात आल्या होत्या. त्यानंतर त्या जालना बसस्थानक कडे पायी जात होत्या. त्यावेळी सावरकर चौकात विओ मोबाईल शॉप समोर फिर्यादीच्या पाठीमागुन दोन अनोळखी इसम आले. त्यातील एकाने सदरील महिलेला पिशवीतून पिवळ्या रंगाचा काही तरी तुकडा पडल्याचे सांगून तो आम्हाला मिळाला असल्याचे सांगीतले. ती महिला सोन्याचा तुकडा पाहत असतांना तीला बाजुच्या छोट्या गल्लीत येण्यास सांगितले. त्यामुळे दोन्ही अनोळखी इसमासह ती महिला बाजुच्या गल्लीत गेले. त्यानंती एकाने एक लाख रुपये दिले तरच सोन्याचे बिस्कीट देता असे म्हटले. त्यावर दुसर्याने पैसे देऊन बिस्कीट घेऊन टाका म्हटला. त्यामुळे सदरील महिलेने रोख 7 हजार रुपये आणि 30 हजार रुपये किंमतीचे 8 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत देऊन सोन्याचे बिस्कीट खरेदी केले. त्यानंतर महिलेने थेट सोनाराचे दुकान गाठले. तीथे गेल्यावर सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे सोनाराने सांगीतले. त्यामुळे महिलेने थेट सदरबाजार पोलीस ठाणे गाठून भामट्याविरोधात तक्रार दाखले केली. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केलाय.