शिर्डी नजीक एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.
या घटनेत वर्षा सुरेश निकम (varsha suresh nikam shirdi) (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
संशयित सुरेश निकम (suresh nikam shirdi case) याला नाशिक जिल्ह्यातून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी व्यक्त केला आहे. संशयिताविराेधात शिर्डी पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.