जालना तालुक्यातील हातवन या गावात आज मुस्लीम समाजाच्या वतीने गणपतीवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. सदरील हानवन या गावात 2005 मध्ये गणेश विसर्जनाच्या दरम्यान दगडफेक झाली होती. तेंव्हापासून हे गाव मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखले जात होते. पोलीसांच्या रेकॉर्डला देखील हे गाव अतिसंवेदनशील म्हणून आहे. परंतु, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि पोलीस उप निरीक्षक राकेश नेटके यांनी या गावात नियमिती शांतता कमिटीच्या बैठका घेत नागरीकात सामाजिक एकोपा निर्माण केला.
त्यामुळे पोलीसांना सर्व धर्मीय आणि सर्व समाजाला एकत्र करण्यात यश आले. आज हातवन येथे गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणूकीदरम्यान मुस्लीम समाजाने गणपतीवर पुष्पवृष्टी करुन सामाजिक एकात्मतेच दर्शन घडविले. या एकात्मतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उप निरीक्षक राकेश नेटके, पोलीस आंमलदार बीराजदार, जाधव, देशमुख, पाचरणे यांनी परिश्रम घेतले.