जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून पोलीस दल अधिक सतर्क झालयं. जिल्ह्यात सुरु असलेल्या उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षक यांनी अत्यंत चोख व्यवस्था ठेवली आहे. या वर्षी गणेश विसर्जनासाठी 53 सीसीटीव्ही, 1 ड्रोन, 1 हजार 868 पोलीस बळ, 1 एसआरपीएफ ची तुकडी आणि 9 स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या 305 जनावर कारवाई करुन तब्बल 92 जनांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व परिस्थितीच्या नियंत्रणासाठी 1 पोलीस अधिक्षक, 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 6 पोलीस उप अधिक्षक, 20 पोलीस निरीक्षक, 49 पोलीस उप निरीक्षक, 1 हजार 300 पोलीस आंमलदार व 492 होमगार्ड तैनात करण्यात आलेत. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे आणि काही संशयास्पद दिसून आले तर तात्काळ पोलीसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केलंय.