गणेश विसर्जन च्या पार्श्वभूमीवर जालना शहरातच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस दलाच्या वतीने रुट मार्ट काढण्यात आला. गणेश विसर्जनासाठी पोलीस दल सक्रीय झाले असून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशसनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आलाय. त्यामुळे संशयास्पद व्यक्तीवर आता पोलीसांची करडी नजर राहणार आहे.
यावेळी पोलीस दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या रुट मार्च मध्ये नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी झाले होते. गत काही दिवसापुर्वी पार पडलेल्या उत्सवात घडलेल्या घटना विचारात घेता पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध बैठका आणि शांतता कमीटीच्या बैठका घेण्यात आल्या होत्या.