जालना शहरातील नुतन वसाहत भागातून एका अल्पवयीन मुलीस पळून नेत जालना ते पुणे आणि मुंबई ते जालना प्रवासात ट्रॅव्हल्समध्येच बालात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या संदर्भात कदिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा कदिम पोलीसांच्या ताब्यात आहे.
जालना शहरातील नुतन वसाहत भागात राहणार्या एका 14 वर्षीय मुलीला सुनिल उर्फ मोनु संतोष जाधव या तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी कदिम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक ज्ञानदेव नांगरे यांनी तपास करुन आज संशयीत आरोपीस ताब्यात घेतलं. सदरील मुलीवर पुणे-मुंबई आणि जालना अशा प्रवासात ट्रॅव्हल्स मध्येच बालात्कार केला. अल्पवयीन मुलीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असून संशयीत आरोपी हा पोलीसांच्या ताब्यात आहे.