जालना – शहरातील सिद्धार्थ नगर येथे विद्युत खांबाचा शॉक लागल्याने 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राजनंदनी सुरेश पंडित (वय 14 वर्षे) राहणार सिद्धार्थ नगर, जालना असं मयत मुलीचं नाव आहे.
महावितरण कंपनीला यापूर्वी वारंवार सूचना विनंत्या करूनही त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आज मुलीला जीव गमावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. यापूर्वी सुद्धा जालना शहरातील राहुल नगर येथे असाच विद्युत खांबाच्चा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला होता. अशा घटना वारंवार होत असतील तर विद्युत कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईकांनी दिलाय. सदरील मुलीस विद्युत शॉक लागल्यानंतर तीला तात्काळ पचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल. पंरतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. 14 वर्षीय मुलीच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरण कंपनी विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेच्या पंचनामा केला. आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकिय सामान्य रुग्णालयात हलविला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय.