उरण(तृप्ती भोईर) : माणदेशी फाउंडेशन हि संस्था ग्रामीण भागातील गरीब,गरजू व इच्छुक महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण राबवित आहे . आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शाखा कामोठे अंतर्गत “अर्थिक साक्षरता प्रशिक्षण” देण्यात आले. यावेळी या संस्थेच्या प्रकल्प समन्वयिका ज्योत्स्ना सिरसकर यांनी महिलांना कुटुंबाचे अर्थिक नियोजन, बजेट, बचत आणि बॅंक व बॅंकेतून मिळणाऱ्या सेवा या विषयावर महिलांना समजेल अशा शब्दांत मार्गदर्शन केले.
ज्योत्स्ना सोबत त्यांच्या सहकारी माणदेशी च्या फिल्ड ऑफिसर मनिषा कदम व नीलिमा मगर यांनीही मोलाचे योगदान दिले आहे. प्रत्येक महिला स्वावलंबी व सक्षम होणे हा यामागील हेतू आहे. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकास व अर्थिक दृष्ट्या साक्षर होण्यासाठी माणदेशी फाउंडेशन संस्था हि आज स्वता गावोगावी जाऊन हे प्रशिक्षणाचे धडे देत आहे. या प्रशिक्षणात जवळपास ५० पेक्षा अधिक विषयावरील प्रशिक्षणाचे धडे हि संस्था देत आहे. हे प्रशिक्षण कृतीत येण्यासाठी जमलेल्या महिलांनीही आपली तयारी दर्शविली. ३० ते ३५ महिलांनी आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाला आपली उपस्थिती दाखविली. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी माणदेशी फाउंडेशन टीमसोबतच पत्रकार तृप्ती भोईर यांनीही मेहनत घेतली.