उरण (संगीता पवार ) – जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून उरण महिला सामाजिक शैषणिक व संसृतिक संस्था उरण ,लायन्स क्लब उरण व द्रोणागिरी लायन्स क्लब च्या वतीने उरण नगरपरिषदेचे विमला तलाव येथे रविवार ( दि. १ ) ऑक्टोबर रोजी मोर्निंग वॉक कट्टा तील जेष्ठ नागरिकांना भेट वस्तू देऊन दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यांत आल्या. ज्यांच्या वयाची ७५ वरचे पूर्ण झालेली आहेत अश्या जेष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला .त्याच प्रमाणे ज्यांचा वाढदिवस होता अशांचा वाढदिवस साजरा केला.
जेष्ठ नागरिकांचे आरोग्य कसे चांगले राहील या संदर्भात मोर्निंग वॉक कट्टाचे संस्थापक सुबोध दर्णे ,व उल्हास मोकाशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . मोर्निंग वॉक कट्टाच्या वतीने राणीमा मदत निधी म्हणून निराधार जेष्ठ महिला राणीमा हिसदर महिन्याला मदत निधी दिला जातो . नागरिक दिन साजरा साजरा केल्याने मोर्निंग वॉक कट्टाचे प्रकाश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले .
या प्रसंगी उरण महिला सामाजिक शैषणिक व संसृतिक संस्था उरण च्या संचालिका गौरी देशपांडे, अॅड .वर्षा पाठारे, गौरी मंत्री, सीमा घरत, संगीता पवार, दीपा मुकादम, लायन्स क्लब उरणच्या अध्यक्षा नीलिमा नारखेडे , लायन सदानंद गायकवाड, लायन नरेंद्र ठाकूर, लायन साहेबराव ओहाळ, लायन ज्ञानेश्वर कोठावदे , लायन प्रकाश नाईक, लायन संजीव अग्रवाल, लायन्स क्लब द्रोणागिरीच्या अध्यक्षा सीमा घरत , सागर सागर चौकर , लिओ मेम्बर , आदित्य घरत, ओमकार घरत, मोर्निंग वॉक कट्टा चे सर्व सदस्य उपस्थित होते .