जालना( प्रतिनिधी ) – जालना येथील जनता हायस्कूल येथे नुकत्याच बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांना निशांत अग्रवाल यांनी आपली आई स्वर्गीय उमादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नऊ दरवाजे बसवून दिले त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना सौ. सुजाता निशांत अग्रवाल यांनी आई ही प्रत्येकाच्या जीवनाची प्रेरणास्त्रोत असते आई शिवाय सुखी जीवनाची आपण कल्पना देखील करू शकत नाही आमच्यावर आईने केलेल्या सुसंस्कारामुळेच हे रचनात्मक कार्य करण्याची शक्ती ईश्वराने आम्हाला दिली असे त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्षा सौ. आयुषी आदित्य बगडिया यांनी निशांत अग्रवाल यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी नऊ दरवाजे उपलब्ध करून देऊन युवकांपुढे एक आदर्श ठेवला असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगितले तर यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले सर्व अतिथींचे गुलाब पुष्प व शाल देऊन मुख्याध्यापिका अनिता पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका वंदना सोनवणे यांनी वर्ग खोल्यांत ग्रीन बोर्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष गंडाळ यांनी मानले यावेळी अग्रशक्ती बहू मंडळाच्या सदस्या सौ अनिता राजेश पित्ती, सौ. नीता अर्जुन पित्ती, बाबासाहेब पवार, सुधीर वाघमारे, संदीप तोडावत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.