घनसावंगी – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रविवारी देशभरात ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत घनसावंगी शहरात समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घनसावंगी व तीर्थपुरी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख -एक तास’ अर्थात ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान राबविण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. त्यानुसार सतीश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानि स्वच्छता मोहीम राबवली. याप्रसंगी सातश घाटगे यांच्या हस्ते सफाई कामगारांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या अभियानात भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, युवा मोर्चाचे अंबड तालुकाध्यक्ष राहुल कणके, विलास घोगरे, विकी शिंदे, विष्णू जाधव, रामेश्वर गरड, राजकुमार उगले, पुरषोत्तम उढाण,भरत परदेशी यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. त्यांनी रुग्णालय परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. यात रुग्णालयाचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते.