अंबड – तालुक्यातील पाथरवाला खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी गावकऱ्यांना गावातील मुलभूत सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन सतीश घाटगे यांनी दिले होते. या अश्वसांची पूर्तता सतीश घाटगे यांनी केली असून या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास मंगळवारी सुरुवात झाली.
पाथरवाला खुर्द जनतेनी सतीश घाटगे यांचे नेतृत्व स्वीकारून गावची सत्ता भाजपच्या ताब्यात दिली. जनतेनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी कामाला लागले आहे. सतीश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणास सुरवात झाली. या रस्त्यासाठी २५/१५ योजने अंतर्गत १५ लक्ष रुपये मंजूर झाले आहे. श्री गिरी बाबा व मेहरनाथ हर्षे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सरपंच विठ्ठल सुडके, उपसरपंच प्रणित हर्षे ग्रामपंचायत सदस्य संजय ढवळे, आकाश खैरे, बाबासाहेब गरड,सखाराम घोडके, ग्रामसेवक काटणकर, सोसायटीचे सदस्य दादाभाऊ नाना हर्षे, सुरेश पाचुंदे, शिवाजी खैरे,दीपक सुडके, योगेश पाचुंदे, राहुल पाचुंदे, पांडुरंग घाडगे, राहुल ढवळे, भाऊसाहेब हर्षे, राम तावरे,सोसायटीचे व्हाईस चेअरमन गणेश खैरे,विठ्ठल दादा लोने,साहेबराव ढवले उपस्थित होते.