जालना (प्रतिनिधी) – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी ब्राम्हण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, दुर्देवाने आजपर्यंत ब्राम्हण समाजाला कुठलही महामंडळ देण्यात आलेले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना ऐवढीच विनंती आहे की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढे करून का होईना ब्राम्हण समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.
याबाबत डॉ. लाखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने रेणुकामाईच्या लेकरांना जे आश्वासने दिली आहे ते पुर्ण करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. राज्य आणि केंद्र सरकारने इतर समाजाप्रमाणे ब्राम्हण समाजाच्या हिताचे निर्णय घेवून गरीब मुलांना शिक्षणासाठी आणि परदेशामध्ये जाण्यासाठी सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि राज्यामध्ये ज्या ठिकाणी शैक्षणिक केंद्र आहेत. पुणे, संभाजीनगर, आंबेजोगाई या ठिकाणी मुला-मुलींसाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिले पाहिजेत तसेच शैक्षणिक भत्ता दिल्या गेला पाहिजे. गुणवत्तेवर लढणार्या ब्राम्हण सजातील रेणुकामातेच्या लेकरांच्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना ज्या ज्या सुविधा आहेे त्या सरकारने उपलब्ध करून द्याव्यात तसेच दि. 10 रोजी संभाजीनगर येथे होणार्या होणार्या आंदोलनापुर्वी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी मान्य करावी ब्राम्हण समाजातील बंधु भगिनींना रस्त्यावर उतरण्याची वेळ येवू देवू नये अशी विनंती देखील डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.