कल्याण (विद्या गडाख) – सहाय्यक आयुक्त भारत पवार (ई प्रभाग क्षेत्र) तसेच मा. संदीप खिसम्तराव (स्वच्छता अधिकारी) साहेब यांच्या मार्गदर्शनाने रेजन्सी इस्टेट रोट्ररी क्लब, रेजन्सी इस्टेट सिनियर सिटीझन क्लब तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्या संयुक्त विद्यमानाने रेजन्सी इस्टेट येथे स्वच्छता हि सेवा श्रमदान मोहीम चे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत शंकरा विद्यालय ते दावडी रोड तसेच रेजेन्सी ते जोंधळे कॉलेज स्टार कॉलनी मानपाडा रोड या ठिकाणी करण्यात आली.

साफसफाई करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक शशांक अर्जुन बामेन आणि नितीन परमार पर्यावरण रक्षक विद्याताई गडाख आणि त्यांचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




















