जळगाव : दहावीचे वर्ष असल्याचे अभ्यास व चांगले मार्क मिळविण्याचा ताण होता. अभ्यासाचा अतिरिक्त तणावातून १४ वर्षीय मुलाने रात्री आई- वडील झोपलेले असताना वरच्या रूममध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मुलाच्या या धक्कादायक कृत्याने परिवार हादरला आहे.
जळगाव शहरातील तन्मय गजेंद्र पाटील (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे (Student) नाव आहे. दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असल्याने तन्मय हा अभ्यासालाही लागला होता. महत्वाचे वर्ष असल्याने शाळा व क्लास देखील लावलेला होता. यामुळे अभ्यासासाठी सारखी धावपळ सुरु होती. यातूनच तो काही दिवसांपासून तणावात असल्याचे परिवारातील सदस्यांनी सांगितले.
दरम्यान मंगळवारी (३ सप्टेंबर) तन्मय हा कुटूंबासह रात्री जेवला. जेवण झाल्यानंतर आई-वडील व मोठा भाऊ खाली झोपले होते. त्यावेळी तन्मय वरच्या मजल्यावर गेला. वडील गजेंद्र पाटील यांना लघुशंकेसाठी जाग आली असता, तन्मय बिछान्यावर दिसून आला नाही. यामुळे त्यांनी घरात शेाध घेत ते वरच्या मजल्यावर गेले. यावेळी त्यांना तन्मय गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला. तन्मयला बघताच वडिलांनी जोरात आरोळी मारत आक्रोश केला. अवाजाने पत्नी व मोठा मुलगा यांनीही धाव घेतली. तन्मयची अवस्था पाहून कुटूंबीयांनी आक्रोश केला. तन्मयने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्याने असह्य होत असलेल्या तणावाचा उल्लेख केला आहे. (Police) पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, पोलीस तपास करत आहेत.