रोहा (रायगड) : आदिवासी वस्ती असलेल्या परिसराच्या जंगल भागात एका वयोवृद्ध (Roha) महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून पंचनामा करत तपस सुरु केला आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धामणसई आदिवासी वाडी जवळील जंगलाच्या रस्त्यावर वृद्ध आदीवासी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०, रा. धामणसई आदिवासीवाडी) असे मयत वृध्देचे नाव आहे. अज्ञात मारेकर्याने डोक्यात दगड घालुन सदर वृध्देची निर्घृण हत्या केली असून रोहा पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे डॉग्ज स्कॉड आला असून तो जंगलच्या रस्त्याच्या दिशेने गेला आहे. दरम्यान वृद्धेचा अगोदर तोंड दाबुन मारून नंतर डोक्यात दगड टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.