जालना – जालन्याकडून राजूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलस्वारास बावणे पांगरी (ता. बदनापूर) शिवारात चंदनझिरा पोलिसांनी पाठलाग करून पकडले,त्याच्या ताब्यातुन देशी, विदेशी दारू व बियरच्या बाटल्या आणि मोटारसायकल, असा मिळून एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी अनिकेत निवृत्ती निलखन (रा. हिवरा राळा) यास ताब्यात घेतले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पोलीस शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, बीट जमादार जितेंद्र तागवाले, मदन बहुरे यांनी केली आहे.दरम्यान सदरील मद्य कोणाकडुन खरेदी केले होते,याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.